होय..बिबट्या फोटोसाठी पोज देताना दिसतोय
आश्वी संजय गायकवाड वेळ संध्याकाळी ६ ची ट्रॅक्टर चालक पडीक शेत नांगरतोय नांगरटीत बगळे अन्न शोधताय तर शेजारीच उसाच्या शेतातील सरीमध्ये बिबट्या बगळ्याची शिकार करण्यासाठी दबा धरुन बसलेला ट्रॅक्टरचे व बिबट्याचे अंतर फक्त पाच फुट अचानक चालकाचे लक्ष्य जाते बिबट्याकडे तर तो बिबट्या जणू एखाद्या फोटोसाठी पोज देतोय तसाच उभा अगदी सायनासंगीन अशात ट्रॅक्टर चालकाचा काळजात धस्स होते अन् बिबट्या पुन्हा आडोशाला उभा राहतो.
सविस्तर वृत्त असे की आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर न्याय दुध संस्थेच्या लगत साहेबराव दातीर यांच्या शेतात अभिषेक भवर हा तरुण शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरत होता तर नांगरलेल्या शेतात बगळे किटकांना टिपत होते शेजारीच उस क्षेत्र ट्रॅक्टर व उस क्षेत्राचे अंतर फक्त पाच फुटाचे त्या उसाच्या सरीत बिबट्या बगळ्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेला होता.
अभिषकचे लक्ष्य नांगरन्याकडे होते सहज उसाकडे त्याचे लक्ष्य गेले तर बिबट्या समोर उभा दोघांची एकमेकांवर नजरा नजर झाली बिबट्या तसाच दिमाखात उभा अभिषकने ट्रॅक्टरच्या ब्रेकवर पाय देत खिशातला मोबाईल काढला व सावध होत बिबट्याच्या दिशेने कॅमेरा चालु केला मात्र बिबट्या किंचितही हलला नाही,
शुटिंग साठी पोज देत राहीला एक मिनिटाची शुटींग झाल्यानंतरही बिबट्या मागे हटला नाही तसाच सरीत बिबट्याने बसुन घेत अभिषेकला फोटो काढण्याची संधी देत होता.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये,बिबट्या शांतपणे उभा दिसत आहे आणि नंतर तो बाजूला झाला,
बिबट्याच्या नैसर्गिक दर्शनाने या शेतकऱ्याने मानसिक समाधान व्यक्त केले.
बिबट्या दिसणे हे सामान्यतः एक शक्तिशाली शकुन मानले जाते अनेकांचा असा विश्वास आहे की ते संरक्षणाचे आणि कठीण काळात मार्गदर्शनाचे आगमन दर्शविते काहींसाठी बिबट्याला भेटणे म्हणजे लपलेल्या भिंतींना किंवा आव्हानाला तोंड देण्याचे आवाहन असु शकते तर काहींसाठी ते सौभाग्याचे आणि मार्गदर्शक आत्म्याच्या उपस्थितीचे लक्ष आहे.
त्याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे त्याची ओळख अधोरेखित झाली आहे.बिबट्या सहसा मनुष्य वस्तीपासून दूर राहणे पसंत करतो,पण कधीकधी तो पाण्याच्या शोधात किंवा शिकारीसाठी मानवी वस्तीजवळ येतो बिबट्या खारे पाणी कधीच प्राशन करीत नाही.
सध्या उस क्षेत्र संपले आहे बऱ्याच शेतकऱ्यानीं घराला कंपाऊड केले आहे त्यामुळे बिबट्या अन्न व सुरक्षित क्षेत्र शोधत असुन शेतकऱ्यांचा व बिबट्यांचा दिवसा समोरासमोर सामना होत असल्याने आश्वी परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ले केले आहे.हाच बिबट्या पुढे हिंसक होऊ शकतो अशी शंका येथील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.