आरोपी उजळ माथ्याने मोकाट
संगमनेर विशाल वाकचौरे तालुक्यातील जोर्वे येथे असणारे शेतकरी दिगंबर भाऊसाहेब काकड हे आपल्या शेतात निरिक्षणासाठी गेले असता शेतातील पाईप लाईनच्या जुन्या वादावरून येथील बाळासाहेब कारभारी दिघे, सुनिल कारभारी दिघे, पवन संजय दिघे, नानासाहेब कारभारी दिघे, अक्षय नानासाहेब दिघे, संजय कारभारी दिघे यांनी त्यांना शिवीगाळ करून लाकडी काठ्या, लोखंडी गज,धारदार कोयत्याने दिगंबर भाऊसाहेब काकड यांना जबर मारहाण केली त्यात त्यांच्या उजव्या हात व डाव्या पायाच्या पोटऱ्यांवर धारदार शास्त्र फिरविले यात दिगंबर काकड हे जखमी झाले असून त्यांचा हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत दिगंबर काकड यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१) ११८(२), ११५(२)३५२, ३५१(३), ३२४(४) १८९(२), १९१(२)१९१(३) १९० प्रमाणे बाळासाहेब कारभारी दिघे, सुनिल कारभारी दिघे, पवन संजय दिघे, नानासाहेब कारभारी दिघे,अक्षय नानासाहेब दिघे,संजय कारभारी दिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला केला आरोपींचा शोध घेतला असता अद्याप पर्यंत आरोपींना अटक झाली नसल्याने यंत्रणेबाबत रोष निर्माण होतना दिसतोय.घडलेल्या या गंभीर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे करत आहे.