वॉशिंग्टन सिटीलाईन मिडिया नेटवर्क सर्दी,डोकेदुखी सारख्या आजारांसाठी औषध घेण्याची नागरिकांना सवय झाली आहे.ही सवय महागात पडत आहे.
कोरोना काळात ७५ टक्के रुग्णांना गरज नसताना अँटीबायोटिक्स दिल्यामुळे सुपरबग म्हणजेच 'अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स' (एएमआर) आणखी वाढला आहे. यात औषधाचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालातून समोर आले आहे.
गरज असताना जर औषधे दिली गेली, तर फायद्यांपेक्षा मोठा धोका असतो. अधिक प्रमाणात औषधे घेतल्याने एएमआरचा प्रसार वाढतो.
डॉ. सिल्व्हिया बरटॅग्नोलियो, एएमआर विभागप्रमुख,यूएन.
