पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त पुण्यात युवा प्रेरणा संवाद उत्साहात

Cityline Media
0
 मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस उपस्थित;तरुणांशी साधला संवाद

पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ‘युवा प्रेरणा संवाद’ या कार्यक्रमात आपल्या राज्याचे कर्तृत्ववान, कार्यशील आणि दमदार मुख्यमंत्री मा. देवेंद्र  फडणवीस उपस्थित राहुन तरुणांशी थेट संवाद साधत,अहिल्यादेवींच्या विचारांवर भाष्य करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सामाजिक न्याय, स्त्रीसक्षमीकरण, जलसंधारण, धार्मिक पुनरुत्थान आणि सर्वसमावेशक विकासाचा आदर्श ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या विचारांची सांगड आजच्या तरुण पिढीपर्यंत घालणे हे काळाची गरज आहे.

यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला आणि अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित युवतींची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्या स्पर्धकाला सन्मानित करण्यात आले – या सर्व गोष्टींनी कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली!

भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उपस्थितीत व भाजपा प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील यांचा मार्गदर्शनाने हा संवाद नवा विचार, सामाजिक बांधिलकी आणि ऐतिहासिक जाणीवांचा संगम ठरला. नव्या पिढीला केवळ प्रेरणा देणारा नव्हे, तर कृतीशील होण्यासाठी दिशादर्शक ठरावा, हीच या उपक्रमामागची भावना होती.

या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजप प्रदेश सरचिटणीस. राजेश पांडे, आ.  योगेश टिळेकर, आमदार. शंकर जगताप, आमदार. हेमंत रासणे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष  शत्रुघ्न काटे, प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडी. विजय हरगुडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, योगेश मैंद, निखिल चव्हाण, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष करण मिसळ, संदीप सातव, राज तापकीर, साकेत जगताप, प्रदेश सहकारी अमृत मारणे सौ. निवेदिता एकबोटे, तेजस्विनी कदम, कुणाल टिळक, भैरवी वाघ, प्रिया पवार, रौनक शेट्टी, नवनाथ पारखी, नवनाथ पठारे, कुणाल मराठे, सचिन जायभये, अजित कुलथे, अभिजीत राऊत, अनिकेत हरकुडे, विनय पूनामिया,अजिंक्य टेकवडे, ललिता जाधव, गणेश साखरे, स्वप्नील काळे, रवी तिवारी, सुनील राणा व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!