पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा..

Cityline Media
0
५२ वर्षाच्या भेटीनंतर गुरु शिष्य झाले भावुक 
गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची आहे या परंपरेमुळे व्यक्तीला ज्ञान, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते.
सध्याचे सेंट झेवियर इन्स्टिट्यूट  हे पूर्वी १०७० चे इलेक्ट्रो टेक्निकल इन्स्टिट्यूट नावाने ओळखले जाई .त्याची स्थापना फादर बाखर यांच्या अधिपत्याखाली होऊन ब्रदर अपोलो नॉरीस पिंटो  हे व्यवस्थापक होते.स्थापनेच्या वेळी प्रथम इन्स्ट्रक्टर म्हणून दिनकर एस. काळे हे होते. 

  मनोज प्रभाकर कदम  हे पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांमधील  विद्यार्थी होते.या  गुरु - शिष्याची काल ५२ वर्षानंतर भेट झाली.त्या भेटीमध्ये अनेक आठवणींना उजाळा मिळाला. १९७० सालचे, इलेक्ट्रो टेक्निकल इन्स्टिट्यूट हे पूर्वीचे व्हिक्टर गॅरेजमध्ये नॉर्दन ब्रांच, (जनता हायस्कूल जवळ) सुरू झाले. 

त्यावेळी दोन ट्रेड होते. इलेक्ट्रिशन (एसएससी पास नंतर) आणि वायरमन (आठवी पासनंतर). पुढे काही वर्षानंतर ही इन्स्टिट्यूट सेंट झेवियर टेक्निकल इन्स्टिट्यूट नावाने प्रचलित झाली ती,जर्मन(संत लुक) हॉस्पिटल समोरील जागेमध्ये. पहिल्या बॅचचे इन्स्ट्रक्टर दिनकर एस काळे आणि त्यांच्या बॅचचे  विद्यार्थी मनोज प्रभाकर कदम यांच्या भेटीमध्ये फादर मायर, फादर एल्मंड डिसोजा, फादर बाकर, ब्रदर पिंटो इत्यादींच्या आठवणींना उजाळा मिळाला.  भेटीत त्यावेळच्या स्टाफमधील भाऊसाहेब कानडे, शिरसाठ, शेरकर यांची आठवण निघाली. गुरु - शिष्यांच्या भेटीने दोघेही अगदी भारावून गेले होते.

गुरु शिष्य भेट म्हणजे गुरु आणि शिष्या दरम्यान होणारी विशेष भेट ही फक्त औपचारिक नाही तर आध्यात्मिक आणि ज्ञानाच्या प्रवासाचा भाग आहे या भेटीमध्ये  ‌ गुरु शिष्याला ज्ञान,मार्गदर्शन, आणि प्रेरणा देतो ,तर शिष्य आपल्या गुरुचा आदर करतो आणि त्यांचे ज्ञान आत्मसात करतो..५२ वर्षाच्या या भेटीने दोन्हीही गुरु शिष्य भावुक झाले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!