१२०० सफाई कामगार आऊट सोर्सिगने भरण्याचा नाशिक महापालिकेचा निर्णय अन्यायकारक

Cityline Media
0
सिंहस्थाच्या नावाखाली १२०० सफाई कामगार भरुन ठेकेदारी सुरू करण्याचा महानगरपालिकेचा डाव
-पुर्व सफाई कामगारांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र 

नाशिक दिनकर गायकवाड- नाशिक महानगरपालिकेने साफ-सफाई ची सर्वच कामे ठेकेदारीने देण्याचा निर्णय घेतलेला असून तो दुदैवी आणि अन्यायकारक असल्याचे येथील सफाई कर्मचारी विकास युनियनचे अध्यक्ष सुरेश मारु आणि अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसचे अनिल बेग यांनी  
प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की झाकीर हुसेन रुग्णालय,बिटको रुग्णालय,इंदिरा गांधी रुग्णालय व मनपातील सर्व छोटे मोठे हॉस्पिटल,दवाखाने,उद्यान विभागातील सर्व गार्डन,फाळके स्मारक,बुद्ध स्मारक,मनपातील सर्व 

जलतरण तलाव,तारांगण,महाकालिदास कलामंदिर,महात्मा फुले कलादालन,मनपाची सर्व नाट्यगृहे,सभागृहे व मनपा शिक्षण मंडळातील सर्व शाळेंची संडास,मुताऱ्या व साफ सफाईची कामे ठेकेदारी आऊट सोर्सिंगने करण्याचा ठराव आयुक्तांनी मंजूर केलेला आहे.

तसेच ४०० सफाई कामगार घंटागाडी,७०० सफाई कामगार आऊट सोर्सिंग ठेकेदारी,जी कामे मनपा कर्मचारी करीत असे ती पुर्व पश्चिम विभागामध्ये ठेकेदारीने देण्यात आलेली आहे.असे असतांनाच पुन्हा सिहंस्थाच्या नावाखाली १२०० सफाई कामगार आऊट सोर्सिंग ने भरण्याचा प्रस्ताव मनपाने सुरु केलेला आहे,म्हणजेच साफ सफाई ची सर्वच कामे आऊट सोर्सिंग ठेकेदारी पद्धतीने करून घेण्याचा निर्णय मनपाने घेतलेला आहे.म्हणजेच कायम सफाई कामगारांची पदे रद्द करून साफ सफाईची सर्वच कामे आता व भविष्यात ठेकेदारी मार्फत सुरु करून मूळ सफाई कामगार उद्धवस्त होणार आहे.तरीही सर्व समाज बांधव,सफाई कामगार व कामगार झोपेचे सोंग घेऊन अन्याय सहन करीत आहे.

जंगलामध्ये जेव्हा आग लागते ती आग हळूहळू छोटे मोठे झाडे झुडपे,नंतर मोठमोठी झाडे,नंतर संपूर्ण जंगलच जळून खाक होऊन बेचिराग होत असते यात अनेक वृक्ष,झाडी,छोटे मोठे प्राणी जनावरे जळून नष्ट होत असतात.सर्व काही बरबाद होत असते अशीच अवस्था सद्या सफाई कामगारांची,सफाई पेशा करणाऱ्या लोकांची,समाजाची व कामगारांची झालेली आहे.म्हणून वेळेच सावध होऊन आपलं घर,आपलं जंगल,आपल्या नोकऱ्या,आपला पेशा,आपली कामे वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे म्हणून सर्वानी एकत्र येऊन हा लढा संघर्ष उभा करून,आपली कामे,आपला पेशा वाचविणे अत्यंत गरजेचे झालेले आहे,म्हणून सर्वानी एकत्र येऊन ही संघर्षाची लढाई एकत्र लढून आणि जिंकुया.

अशी सर्व परिस्थिती अवगत करून,संघर्ष लढाई करून यासाठी जबाबदारीने काम करणे ही आमची जबाबदारी असल्याने म्हणून सर्व प्रपंच आपल्या समोर मांडण्यात येत आहे.आम्ही आमची जबाबदारी पार पाडीत आहोत,आपण आपली जबाबदारी,कर्तव्य पार पाडणार आहोत सर्वांनी एकत्र येऊन हा ठेकेदारीचा निर्णय हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे भविष्यात या ठरावाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली तर सर्वानी सामिल व्हावे असे सुरेश मारु व अनिल बेग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!