उपाध्यक्षपदी मच्छिंद्र गडाख यांची बिनविरोध निवड
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव व निर्यातीचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध करणार - बाबासाहेब पावसे
संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील देवगड कृषी विकास फळे व भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्था हिवरगाव पावसा या संस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पावसे तर उपाध्यक्षपदी मच्छिंद्र गडाख
यांची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्ष-बाबासाहेब पावसे
संस्थेची अध्यक्ष पदाची निवड संस्थेच्या नियमांनुसार आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार निवड प्रक्रिया पार पडली.या निवडीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक सहकार अधिकारी उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर प्रदीप वीरनारायण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.संस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळातून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्याचे ठरले त्यानुसार बाबासाहेब यादवराव पावसे यांचाअध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाबासाहेब यादवराव पावसे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर केली.तसेच उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने मच्छिंद्र काशिनाथ गडाख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचे स्वागत करत मावळते अध्यक्ष तथा संस्थापक यादवराव पावसे आणि उपाध्यक्ष वृक्षमित्र गणपत पावसे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक डॉ.विजय पावसे,संचालक नितीनचंद्र भालेराव,सरपंच सेवा संघाचे राज्य अध्यक्ष तथा संचालक रोहित पवार,रविंद्र पावसे,संचालक दशरथ ढोकरे, भाऊसाहेब घोलप,नवनाथ कोल्हे,कैलास पावसे,नितीन शिरसाट,सुरेश गडाख,सुनिता पावसे,सविता पावसे,यांच्या सह संस्थेच्या संचालक मंडळ व हिवरगाव पावसा येथील सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
उपाध्यक्ष-मच्छिंद्र काशिनाथ गडाख
तसेच देवगड कृषी विकास फळे व भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्थे मार्फत स्थानिक शेतकऱ्यांचा उत्पादित विक्रीसाठी फळे व भाजीपाला संकलित करून राज्यातील व त्यासाठी राज्याबाहेरील,शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे.देशातील तसेच राज्यातील मोठ्या लोकसंख्येचे शहरांमध्ये भाजीपाल्याची खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी कंपन्याच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दर व हमी भाव मिळेल,शेतकऱ्यांना सुरक्षित व संरक्षित बाजारपेठ उपलब्ध होईल.शेतकऱ्यांच्या मालाचे जागेवर संकलन केले जाईल तसेच स्थानिक पातळीवर विविध संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.तसेच शासनाच्या कृषी व आत्मा, सहकार व पणन विभागाच्या मार्फत विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यांना संस्थे मार्फत मिळवून देऊ असे नवनियुक्त अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी सांगितले.