-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ठेवला गुंडाळून
नागपूर सिटीलाईन मिडिया नेटवर्क सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयात पारदर्शकता व लोकाभिमुख प्रशासनासाठी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख) नुसार १७ बाबींची माहिती स्वतःहून प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. याबाबत राज्य शासनाने अनेकदा आदेश काढले आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयानेही आदेश दिले आहेत. मात्र, शहरातील बहुतांश सरकारी कार्यालयांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.
नागपूरात विविध शासकीय कार्यालये येथे आहेत.गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे आ. प्रवीण दटके यांनी पुण्यातील सर्व आयुक्त आणि संचालनालयाची कार्यालये उपराजधानीत आणावी,अशी मागणी केली होती.शहरातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक
माहिती देणारे फलक कुठेही दिसत नाहीत. महापालिका मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालये, महावितरण कार्यालये, पोस्ट कार्यालये, पोलिस ठाणी, पोलिस चौक्या, पोलिस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासह तहसील कार्यालय, तलाठी व मंडल अधिकारी, नगर भूमापन, दुय्यम निबंधक कार्यालयातही माहिती अधिकार कायदा १७ बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
या कार्यालयाची रचना व कार्यालयात चालणारे कामकाज व त्याला जबाबदार अधिकारी, त्यांची कर्तव्ये याची माहिती नागरिकांना माहीत असणे गरजेचे असते. त्यासाठी नागरिकांना कोणाकडेही ही माहिती विचारण्याची गरज नसते
बहुतांश ठिकाणी माहिती अधिकाराचे फलक नसल्याने नागरिकांची होतेय दिशाभूल
काय? आहेत १७ बाबी
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये
निर्णय घेण्याची कार्यपद्धती, पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली
कार्यवहनासाठी विभागाने ठरविलेली तत्त्वे
कार्य पार पाडण्यासाठी वापरावयाचे नियम व कायदे
कागदपत्रांचे वर्गीकरण दाखवणारे विवरणपत्र
जनसंपर्कातील विभागात असलेल्या व्यवस्थेबाबतचा तपशील
कार्यालयीन दोन किंवा अधिक व्यक्तींनी बनविलेले सल्लादायी मंडळे, परिषद व इतर समित्या
अधिकारी व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच नियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पद्धती
सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च रकमांचा अहवाल
अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांचा तपशील
ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशांचा तपशील.
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या किंवा कार्यालयात असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील
सार्वजनिक ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील
माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील
