महापालिका सुरक्षारक्षकांचे काम २६ दिवस अन् पगार ४० दिवसांचा
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क
महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एक घोटाळा समोर आला आहे.महापालिकेत महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे १०० सुरक्षारक्षक कंत्राटी स्वरूपात काम करतात. हे सुरक्षारक्षक २६ दिवस काम करीत असले,तरी 'ओव्हरटाइम' दाखवून त्यांचा ४० दिवसांचा पगार काढला जात असल्याचे समोर आले आहे. यावरूनच दोन अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच वादावादी होऊन, किरकोळ हाणामारीही झाल्याच्या घटनेची पालिकेत जोरदार चर्चा रंगली आहे आणि सर्व जण अवाक् झाले
अतिक्रणांविरोधातील कारवाईत महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचे काम प्रभावी नसल्याने,पालिकेने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे शंभर सुरक्षारक्षक कंत्राटी पद्धतीने घेतले. सुरक्षा विभागाकडे यातील ३० सुरक्षारक्षक
महापालिका तपास करणार का ?
दोन अधिकाऱ्यांच्या भांडणात पालिकेतील सुरक्षारक्षकांच्या वेतनातील घोटाळा समोर आला आहे. याशिवाय प्रत्यक्षात पाच बंदुकधारी सुरक्षा रक्षकांचे वेतन दिले जात असताना, केवळ एकच बंदुकधारी रक्षक असल्याचे आणि बंदूक सांभाळण्यासाठी आणखी तीन सुरक्षा रक्षक नेमल्याचाही दावा केला जात आहे. महापालिका या घोटाळ्याचा तपास करणार का, आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हस्तांतरित करून ते महापालिका मुख्य इमारत, आयुक्त कार्यालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय आदी ठिकाणी तैनात केले गेले.
गेल्या काही महिन्यांपासून हे सुरक्षारक्षक महिन्यातील २६ दिवस काम करतात; परंतु त्यांनी अतिरिक्त वेळ काम केल्याचे दाखवून, ३० दिवसांचा पगार काढला जात आहे. वास्तविक, शहरात दररोज आठ तासांपेक्षा कमी वेळ अतिक्रमण कारवाई होते; त्यामुळे 'ओव्हरटाइम'
कशासाठी, अशी शंका आल्याने कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांनी अतिक्रमण विभागाकडून संबंधित सुरक्षारक्षकांचे हजेरीपत्रक मागितले. त्यात सुरक्षा विभागाकडील ३० कर्मचाऱ्यांच्या हजेरीत तफावत आढळल्याने, त्यांनी सुरक्षा अधिकारी राजेश विटकर, उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे चौकशी केली.
त्यावरून बनकर व लिटके यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. 'बनकर यांनी मला शिवीगाळ केली;
त्याचबरोबर माझी लवकरच अतिक्रमण विभागात बदली होणार आहे, तुला बघून घेतो, असा दम दिला. माझा मोबाइल फेकून दिल्याने तो फुटला,' अशी तक्रार लिटके यांनी केली आहे. बनकर यांनी, 'सुरक्षारक्षकांची हजेरी घेण्याचे काम अतिक्रमण विभागाचे आहे, आमचे नाही. लिटके यांनी माझ्या केबिनमध्ये येऊन अरेरावी केली, माझी पदवी बनावट आहे, असा आरोप केला. माझ्या अंगावर धावून येत धक्काबुक्की केली. स्वतःचा मोबाइल माझ्यावर फेकला; त्यामुळे आयुक्तांकडे तक्रार केली आहे,' असे सांगितले.
याबाबत पत्रकारांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता, 'या दोघांच्या युद्धापेक्षा देशाचे युद्ध महत्त्वाचे आहे, त्या संदर्भातील बैठकीत आहे, ते नंतर पाहू,' असे सांगितले.
