सोनगाव प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील रामपुर येथील लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रथम क्रमांक -कु .सृष्टी शरद पठारे .हिने मिळवला असुन तिला ९२.६० % गुण मिळाले आहे द्वितीय क्रमांक-चि.यश अरुण भोसले याने प्राप्त केला असुन त्यास ८७.६०.% गुण मिळाले तर तृतीय क्रमांक-कु प्रतिक्षा संजय भोसले हिने प्राप्त केला असुन तिला.७७.६०% गुण मिळाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष .राहुल साबळे,उपाध्यक्ष .ज्ञानदेव लोखंडे व सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र साबळे व सर्व सदस्य,रामपूर गावचे सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य,व सर्व ग्रामस्थ ,वि .का .सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब पा.पठारे व सर्व सदस्य .तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संपतराव कुटे सर्व सेवकवॄंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.