शिबीर केवळ खेळाचे नव्हे तर जीवनमुल्यांचेही प्रशिक्षण

Cityline Media
0
शारदा स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सोमैया समर कॅम्पमध्ये बहारदार सहभाग!

श्रीरामपूर दिपक कदम सोमैया विद्या विहार विद्यापीठ, मुंबई आयोजित राज्यस्तरीय समर कॅम्पमध्ये श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथील १०४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिनांक ५ मे ते १७ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या या विशेष शिबिरात ८६ मुले व १८ मुली सहभागी झाल्या.लक्ष्मीवाडी, साखरवाडी, नरेशवाडी व शारदा शाळेतून एकूण २०० विद्यार्थ्यांचा सहभाग हा ग्रामीण भागातील शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने उचललेला महत्वपूर्ण पाऊल ठरला.
१३ दिवस घरापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी नवे अनुभव घेत खेळ, शिस्त, स्वावलंबन व सहकार्य यांचे महत्त्व आत्मसात केले.या काळात क्रिकेट, बॅडमिंटन, स्क्वॉश, बास्केटबॉल, पोहणे, दोरी चढणे, फुटबॉल, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, जुडो, कराटे, टेबल टेनिस, फिटनेस ट्रेनिंग व पिकलबॉल अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जोमाने भाग घेतला.खेळांसोबतच विद्यार्थ्यांनी (व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) मध्ये प्लंबिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर, एसी रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उपयुक्त व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.शिबिरात विद्यार्थ्यांनी सोमैय्या कॅम्पसवरील विविध महाविद्यालयांना भेटी देत उच्च शिक्षणाच्या संधी व करिअरचे विविध पर्याय जाणून घेतले. विशेष आकर्षण ठरले भारताचे माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांच्याशी झालेली थेट भेट आणि प्रेरणादायी संवाद.
समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि संचालन स्वतः हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वगुणांचे व संघटनकौशल्याचे सर्वांनी कौतुक केले.समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना सोमय्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय समीर सोमैया म्हणाले, “प्रत्येकाने नेहमी सत्य बोलले पाहिजे आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला पाहिजे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रामाणिकपणा, सहकार्य आणि करुणा ही अत्यंत आवश्यक मूल्ये आहेत.”ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ यशाकडे धाव घेत न बसता, चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अपयशातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इथे मिळालेला अनुभव तुमच्या आयुष्यभरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे.”या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, त्यांनी प्रत्येक सत्रात मन:पूर्वक आणि उत्साहाने सहभाग घेतला.श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्यातर्फे सोमैया ट्रस्टचे माननीय अध्यक्ष समीर सोमैया यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले,की त्यांनी विद्यार्थ्यांना असा संस्मरणीय व अनुभवसमृद्ध शिबीर अनुभवायला दिला.हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शिबीर न राहता,एक जीवनमूल्य शिकवणारी शाळा ठरली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!