शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लगतच होण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन ही करणार-खासदार निलेश लंके
अहिल्यानगर दिपक कदम अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नगर शहरालगतच सुरू झाले पाहिजे,ही माझी ठाम भूमिका आहे असे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट सांगितले.
शिर्डी येथे हे महाविद्यालय स्थलांतर करण्याचा डाव सुरू असून,त्याला मी तीव्र विरोध करतो.नगर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून अहिल्यानगर परिसर उपयुक्त असून, शहरालगत २५-३० एकर जागाही उपलब्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली असून मुख्यमंत्री व समितीला पत्रव्यवहारही केला जात आहे.
शिर्डीला आधीच एक मोठे हॉस्पिटल असून, महाविद्यालय तिकडे नेल्यास संपूर्ण जिल्ह्याचा लाभ मर्यादित राहील.नगर शहरालगत हे महाविद्यालय झाल्यास जिल्हा रुग्णालयाचा उपयोग होईल आणि शहराच्या विकासालाही हातभार लागेल.
जिल्ह्याच्या सर्वांगीण हितासाठी,आणि सर्वसामान्य जनतेसाठी योग्य निर्णय व्हावा याच अपेक्षेने हे महाविद्यालय अहिल्यानगर शहरालगतच असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.