पी.चिदंबरम, शशी थरूर भाजपाच्या वाटेवर?
नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क-मोदी सरकारच्या पाकिस्तान विरोधातील खमकी कारवाईचे सर्वांनीच कौतुक केले. तर युद्ध विरामावर काही पक्ष नाराज झाले त्यातच काँग्रेसच्या पक्षीय भूमिकेविरोधात बडे नेते विधान करत असल्याने शशी वरुरांपाठोपाठ पी.चिदंबरमही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
पाकिस्तान विरोधात लष्काराच्या ऑपरेशन सिंदूरने भारतीयांची मने जिंकली. त्यात मोदी सरकारची कुटनीती,धोरणाचे कौतुक झाले.तर युद्ध विरामावर पण काहींनी तोंडसुख घेतले. एकूणच या सर्व घडामोडींवर सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा मतमतांतरे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शशी थरून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कौतुक केले आहे.अनेक मंचावर त्यांचे हे प्रेम उफाळून आलेले दिसते. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री पी. विदंबरम यांनी सुद्धा हिच री ओढली आहे .त्यांच्या एका वक्तव्याने कविसमध्ये भुकंपाची स्थिती आली आहे
चिंदबरम यांनी नुकताच एका इंग्रजी दैनिकात लेख लिहिला. त्यात ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान मधील युद्ध विरामावर थेट भाष्य वेले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या फैसल्यांचे कौतुक केले आहे त्यातच त्यांच्या एका विधानाने मोठी आग लागली आहे.त्यांनी इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा केला. त्यामुळे येत्या काळात दक्षिण राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदलली तर नवल वाटायला नको.
विदंबरम् यांनी काल इंडिया आधीच्या अस्तित्वावर सवाल उठवला.ही आघाडी सध्या अस्तित्वात आहे का,असा घणाघात त्यांनी केला त्यांनी ही टिप्पणी दिल्लीतील इंडिया इंटरनेशनल सेंटरमधील एका कार्यक्रमात केला 'कॉन्टेस्टींग
डेमोक्रेटिक हेफिसीट' या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी त्यांनी आघाडीवर सडेतोड मत मांडले.या पुस्तकाच्या अनुषंगाने इंडिया आघाडी अस्तित्वात आहे त्यात या मताशी आपण सहमत नसल्याचे ते म्हणाले. खरे तर सलमान खुशींद त्याचे उतर देऊ शकतील, ते या आघाडीशी चर्चा करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत,असे विदंबरम् म्हणाले.जर इंडिया आघाडी कायम आहे,तर मला आनंद आहे पण ही आघाडी मजबूत आहे,असे मला वाटत नाही.कोणतीही आघाडी ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही,असे ते म्हणाले, तर त्याचवेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी सारखा संघटित राजकीय पक्ष देशाच्या इतिहासात नसल्याची पुस्ती जोडली. हा केचळ एक पक्ष नाही तर एक मशीन आहे. या मशीन मागे सुद्धा एक मिशन असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही संस्था देशातील अनेक संस्थावर नियंत्र ठेपतात. निवडणूक आयोगापासून ते पोलीस त्यांनी केली. हा एकपक्षीय शासन व्यवस्थेसारखा काम करत असल्याचे त्यांनी व्यक्त केले.