श्रीरामपूर दिपक कदम राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. व मा.खा.डॉ.सुजय विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर नगरपालिकेच्या मा.नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी नेतृत्व केलेल्या आपल्या प्रभागात थत्ते मैदान (४ हायमास्ट), श्री म्हसोबा महाराज चौक, शांताई-निलकंठ अपार्टमेंट चौक, विद्या हाऊसिंग सोसायटी येथे एकूण ७ सोलर हायमास्ट बसविण्याची सुरवात श्री म्हसोबा महाराज चौक येथून करण्यात आली असल्याची माहिती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली.
मध्यंतरी थत्ते मैदान येथे “डेली वर्कआऊट ग्रुपच्या” सदस्यांच्या हस्ते या हायमास्ट कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. थत्ते मैदान येथे श्रीरामनवमी असल्याने प्रत्यक्ष काम होण्यास थोडा विलंब झाला मात्र “शाश्वत काम” झाल्याचे समाधान आहे. झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले प्रसंगी प्रभागातील सर्व सहकारी उपस्थित होते.