श्रीरामपुरात निघाली भव्य तिरंगा महारॅली

Cityline Media
0
-श्रीरामपूरात सर्वपक्षीय,सर्व धर्मीय भव्य तिरंगा महारॅली सहभागी 
-तृतीयपंथीयांची उपस्थिती लक्षणीय

श्रीरामपूर दिपक कदम भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि ऑपरेशन सिंन्दूर मोहिमेत शहीद झालेल्या विरांना
श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रीरामपूरात नुकतीच भव्य तिरंगा महारॅली निघाली होती.
ऑपरेशन सिन्दुंर मोहिमेच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युनर टिले भारतीय जवानांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय जवानांच्या पराक्रमाने पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले.
मात्र या मोहिमेत काही भारतीय जवानांनी वीरमरण पत्करले,त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत,असा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती श्रीरामपूर मधील व्यापारी असोसिएशन,डॉक्टर,वकील, इंजीनियर,याच्यांसह सर्व
क्षेत्रातील मान्यवरांनी व पक्षांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी श्रीरामपूर शहरातील स्टेशन मारूती मंदिरापासून या रॅलीला सुरूवात झाली.या रॅली मध्ये मा.आ.माऊसाहेब कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा. नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भाजपाचे जितेंद्र छाजेड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, भाजपाचे मा.तालुकाध्यक्ष दिपक पटारे, डॉ. शंकरराव मुठे, गिरीधर आसने,नानासाहेब पवार, रामभाऊ तरस,आशिष धनवटे, शशांक रासकर, संजय छल्लारे, सुभाष त्रिभुवन, अर्जुन दामाद सागर भोसले, शामल शिंदे, संजय गांगड,विठ्ठल राऊत, गौतम उपाध्ये, मारूती बिंगले, पढेगावचे सरपंच किशोर बनकर, बाळासाहेब हरदास, कैलास बोर्डे, रवि पाटील, केतन खोरे, कुनाल करंडे, मनोज लबडे, रुपेश हरकल,शेटे, सौ.पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण,सौ.मंजुषा ढोकचौळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रॅली ही स्टेशन मारूती मंदिराहून मेनरोड मार्गे,छत्रपती शिवाजी रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. प्रसंगी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी पिंकीगुरू यांच्यासह तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप प्रसंगी सेनेच्या तिन्ही दलातील निवृत्त सैनिक उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत यावेळी भारत मातेला वंदन करत,शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत, राष्ट्रगीत म्हणत या तिरंगा महारॅलीचा समारोप करण्यात आला.
सर्व छायाचित्रे-अमोल कदम 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!