शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे पूर्वसूचना
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाच्या पुर्व संध्येला महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त.देवेन भारती ह्यांची सदिच्छा भेट घेऊन,त्यांना मोर्चाची पुर्व सुचना दिली.तसेच मोर्चासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
सोबतच महिलांबाबत असलेल्या विविध विषयांवर देखील सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.सदर चर्चे दरम्यान आयुक्तांनी उद्याच्या मोर्चाला व भविष्यातही पोलिस दलाचे सहकार्य राहील,असे आश्वासित केले.
प्रसंगी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत,किशोरी पेडणेकर,ज्योती ठाकरे, शितल देवरुखकर-शेठ , शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, संघटक रंजना नेवाळकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, शुभदा शिंदे, पद्मावती शिंदे, रजनी मिस्त्री, युगंधरा साळेकर,अनिता बघवे, प्रज्ञा सकपाळ, मनीषा नलावडे व मा.नगरसेविका रोहिणी कांबळे उपस्थित होत्या.
