ग्रामीण भागातील तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन देणार- आमदार खताळ

Cityline Media
0
जांभूळवाडी फाटा येथे आमदार चषकचा आ.अमोल खताळ यांच्या हस्त शुभारंभ
संगमनेर प्रतिनिधी ग्रामीण भागातील तरुणांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत व्यासपीठ उपलब्ध करून  दिले जाईल असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
तालुक्यातील जांभुळवाडी फाटा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार खताळ म्हणाले की पूर्वी दुष्काळी, आणि डोंगरी भाग म्हणून या भागाला नेहमी हिणवले जात होते.मात्र आता या भागात पाणी आले आहे आणि क्रिकेट सारख्या मोठ्या स्पर्धा सुद्धा होत आहे. या स्पर्धांमधून ग्रामीण भागातील तरुणांना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला  प्रयत्न राहणार असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले
   यावेळी कवठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे तळेगावचे माजी सरपंच मयूर दिघे  कासारे सरपंच महेश बो-हाडे आमदार अमोल खताळ समर्थक नवनाथ कानकाटे,सचिन  जोंधळे योगेश जोंधळे गणेश  वराडे,अमित सुपेकर ,अशोक गाढे,गोरख नाईक ,सोमनाथ शेळके शामराव नाईक पोलिस पाटील वाल्मीक गाडे पा. मयूर कार्ले सुयोग कार्ले,दत्तात्रय कार्ले,रमेश कानकाटे गोरख गांडुळे ,संजय लहामगे,दत्तात्रय  गाडे ,भागवत  गायकवाड ,एकनाथ  गाडे ,दत्तात्रय  सोनवणे ,नंदकुमार मोरे सुभेदार अक्षय  कार्ले ,अक्षय आरणे  पत्रकार रामनाथ  बो-हाडे  भीमा कार्ले  संजय जोंधळे  आदिलसह परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते
 आमदार अमोल खताळांनी  क्रिकेटची फटकेबाजी करत केला आरंभ 
जांभूळवाडी फाटा येथे सुरू असणाऱ्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत आमदार अमोल खताळ यांनी हातात भेट घेत  चौकार षटकार मारत चांगलीच  फटके बाजी केली त्यामुळे ही फटकेबाजी सर्वत्र चर्चेची ठरली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!