अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हयातील खरीप हंगाम पुर्व तयारीचा आढावा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आलीअसून जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना या बैठकीस विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
प्रसंगी कृषी क्षेत्रातील बदल तसेच शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेवून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी कृषी विभागाला देण्यात आल्या
खरीप हंगामात खत आणि बियाण्यांची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी.कृत्रिम बुध्दीमतेचा वापर तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादकता वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहन बैठकीत केले.
या बैठकीला आमदार.काशिनाथ दाते,आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे
यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी उपस्थित होते.
