कळंब सिटीलाईन न्यूज नेटवर्क अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने रविवारी, १८ मे रोजी कलावंत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामजयंती निमित्ताने कलावंत मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा पार पडणार आहे. नगरपंचायत सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी १० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर ठाकरे, उद्घाटक म्हणून बसवेश्वर माहुलकर असणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.श्याम खंडारे असणार आहे. यावेळी संतांचे आणि महापुरुषांच्या विचारांचे सिंचन समाजामध्ये कलावंतांनी केले आहे. यामुळे कलावंतांच्या आर्थिक सक्षमतेसाठी प्रभावी योजना राबविण्याच्या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यासह विदर्भातील विविध ठिकाणांवरून कलावंत येणार आहेत.
