न्यायमूर्ती भूषण गवई देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान

Cityline Media
0
नवी दिल्ली सिटीलाईन मिडिया नेटवर्क)न्यायमूर्ती भुषण रामकृष्ण गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत.नुकतेच भारताचे माजी मुख्य न्यायाधीश संजीव खत्रा हे सेवानिवृत्त झाले.त्यानंतर खत्रा यांनी बी. आर. गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंडळाकडे केली होती त्यानुसार आज नुकतीच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची
शपथ दिली.
भूषण गवई हे भारताचे दुसरे दलित सरन्यायाधीश असणार आहेत. याआधी त्याचे के.जी.बालकृष्णन हे पहिले दलित सरन्याधीश होते. न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाल सहा महिन्यांचा असेल आणि ते २३ डिसेंबर २०२५ रोजी निवृत होतील न्यायमूर्ती गवई. यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला,त्यांनी १६ मार्च १९८५ रोजी वकील म्हणून नोंदणी केली.कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरू केली.नागपूर

खंडपीठात प्रमुख्याने घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्याच्या क्षेत्रात यांनी आपली वकिली सुरू  ठेवली आणि नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठात सल्लागार म्हणूनही काम केले. १४ नोव्हेंबर २००३ रोजी बी. आर. गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि १२ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली.
ज्या उच्च न्यायालयातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई, नागपूर,औरंगाबाद आणि पणजी  ‌खंडपीठामध्ये न्यायालयीन कामकाजात भाग घेतला आज त्यांची नियुक्ती झाल्यानंतर  मराठी माणसाचा अभिमानाने उर ‌भरुन आला आहे.

न्यायालयाचे सर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या भुषण गवई यांच्या सेवानिवृतीची तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे म्हणजे ते अवघे सहा महिने मुख्य ग्यायाधीश म्हणून काम करतील आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने संजीव खन्ना यांनी त्यांधी निवड केली.

दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निकालांशी न्यायमूर्ती गवई यांचे नाव जोडले गेले आहे.यामध्ये २०१६ च्या नोटाबंदीचा निर्णय कायम ठेवणे आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे समाविष्ट आहे.या निकालांमध्ये त्यांची मते न्यायालयीन दृष्टिकोनातून महत्वाची मानली गेली आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!