दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कोणार्कनगरला दिड लाखाची घरफोडी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड- घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नुकतीच कोणार्कनगर येथे घडली.
फिर्यादी रोहित दिगंबर बर्वे (रा. शिव रो-हाऊस, कोणार्कनगर) हे दि. १९ एप्रिल ते ५ मे दरम्यान बाहेरगावी गेले होते ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातून ३५ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, २५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व एक लाख रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!