-हळदी पासून मुलगी सासरी जाई पर्यंतच्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी पार पाडली सर्व कामांची जबाबदारी
-३२ वर्षीच्या भेटीने वर्गमित्र गहिवरले.
-गायकवाड पुलाटे यांच्या विवाहाचे सर्वत्र कौतुक आणि चर्चा
आश्वी : संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन १९९२-९३ च्या दहावी इयत्तेतील माजी विद्यार्थ्याचे स्नेह सम्मेंलन सर्वात आवडत्या मित्राच्या मुलीच्या विवाहात पार पडले या विवाहा आणि स्नेहसंमेलनाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चिफ इलेक्ट्रीकल इंजिनिअर शाम गायकवाड,यांची कन्या तसेच प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड यांची नात चि.सौ.का. श्रृतिका व दुर्गापुर येथील कोंडीरामशु रावसाहेब पुलाटे यांचे चिरंजीव अभय यांचा शुभविवाह नुकताच चिंचपुर येथील सप्तपदी मंगल कार्यालयात मोठया उत्साहात पार पडला.
या विवाह सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या माजी.अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा.युवा नेते मा.खा. सुजय विखे सुस्मिता विखे धुव्र विखे पा. यांच्या सह जिल्हयातुन मोठ्या संख्येने ग्रामस्थ मित्र नातलग उपस्थित होते मात्र या सर्व वऱ्हाडी मंडळीचे लक्ष्य या सर्व माजी विदयार्थी वर्गाकडेच होते सर्व मित्र व मैत्रिणी सपत्नीक अगदी हळदी समारंभापासुन उपस्थित होते सर्व नियोजन ते करत होते तर एकत्र येऊन सर्व मित्र मैत्रिणींनी एकमेकांना भेटुन गप्पा मारल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला नव्याने मैत्री फुलली,उजाळा मिळाला मित्राच्या मुलीच्या लग्नात एकत्र येणे मैत्रीचे प्रतिक होते.
मित्राच्या मुलीच्या विवाहात नियोजन अतिशय सुंदर करत समाजाला चांगला संदेश दिला असे गौरव उदगार सौ.शालिनी विखे पाटिल यांनी काढत या सर्व माजी विद्यार्थोंना शुभेच्छा दिल्या यावेळी बी.जे.ऑटोमेशनचे संस्थापक बापूसाहेब सांगळे व सुवर्णा बिहानी यांनी पुढाकार घेऊन हा योग सोशल मिडिया स्नेहसम्मेंलन व विवाहच्या माध्यमातून घडवत अनेक वर्षानतंर प्रत्यक्ष भेट झाल्यामुळे या माजी विद्यार्थ्यानच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.
यावेळी बिलाल शेख, प्रादेशिक परिवहन अधिकारी भिमराज नागरे,सुनिल गिते ,सुरेश भोसले,जगन्नाथ घुगे ,सुषमा धस, योगिता खपके , रवींद्र कोळसे,बबलु पठाण, डॉ.संजय भवर ,बापू सांगळे अनिल वाडेकर सुवर्णा बिहानी ,सुनिता नागरे, संगिता गागरे, सविता सोनवणे सुनिता सांगळे ,संगिता भोसले बंडु मुन्तोडे ,अजित म्हस्के ,भारत भडकवाड, प्रकाश भडकवाड ,बाळासाहेब लावरे, किशोर मांढरे ,अनिल दातीर, लक्ष्मण गोडगे, अजित म्हस्के, चांगदेव खेमनर, विजय शिंदे, संजय शिंदे,शैला डोंगरे,नंदा माने ,अनिल मांढरे, किशोर मांढरे, विलास गायकवाड, सुरेश पवार शेडगावचे मा.उपसरपंच व नवनिर्वाचित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचे संचालक दिलीप नागरे,आदिसह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
