मुंबई मंत्रालय प्रतिनिधी लाल बहादूर शास्त्री धरण हे अलमट्टी या नावाने ओळखले जाते भारतातील उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवर प्रकल्प असून या धरणाच्या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक घेणार असून,राज्य सरकारने न्यायालयातही बाजू भक्कमपणे
मांडली असल्याचे बैठकीत सांगितले.
बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार सर्वश्री अरुण लाड, इद्रिस नायकवडी डॉ. विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे व उल्हास पाटील उपस्थित होते.
जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,मुख्य अभियंता ह.वि.गुणाले यांनी विभागाच्या स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीची माहीती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी दिली
