पुस्तक वाचा म्हणजे मस्तक ठिक होईल- दिलीप सरोदे

Cityline Media
0
नेवासा (दिपक कदम) -आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पुस्तकाला हात लावीत नाही, कारण आपण सर्व मोबाईलच्या आधिन झालो आहोत,खरंतर वाचन संस्कृती हा फार मोठा विषय आहे परंतु अनुभव असा आहे की पुस्तक वाचाल तर मस्तक ठिक होईल,असे प्रतिपादन पीचडगावचे मा. जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे यांनी केले.
 नेवासा तालुक्यातील  पिचडगाव येथे शब्दगंध  साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य नेवासा शाखेने आयोजित केलेल्या फिरते मोफत वाचनालय उपक्रमात ते बोलत होते .याप्रसंगी ग्रामस्थांना पुस्तक वाचनाचे महत्व विषद करताना स्वतःचे अनुभव सांगताना ते म्हणाले की,एकदा तर मी एका घरी पुस्तक आणायला गेलो असता त्या वाडग्यातील कुत्रा मला चावलां तरी पण पुसक वाचन मी सोडलेले नाही.ते पुढे म्हणाले की लेखकांनी पुस्तक खूप अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात,म्हणून लोकांनी ते वाचली पाहिजेत.जोपर्यंत आपण पुस्तक हातात घेत नाही तोपर्यंत मेंदूला चालना मिळत नाही, आणि म्हणून तुमच्या हातात पुस्तक आणून देण्याचे काम शब्दगंध साहित्यिक परिषदेची नेवासा शाखा करीत असून त्याबद्दल शब्दगंधला धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणून शब्दगंधच्या  सर्व सदस्यांचे विशेषता डॉ.अशोकराव ढगे , नेवासा तालुका शाखेचे  अध्यक्ष प्रा. डॉ.किशोर धनवटे ,दिगंबर गोंधळी ,प्रा.डॉ.दिगंबर सोनवणे यांचे आभार मानतो .

प्रारंभी शब्दगंध नेवासा शाखेचे उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी संबळ वाद्य वाजून वातावरण निर्मिती केली.शब्दगंध नेवासा शाखेचे सल्लागार माजी कुलगुरू व माजी प्राचार्य, कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी फिरते मोफत वाचनालय उपक्रमाच्या उद्देश स्पष्ट केला.

शब्दगंध नेवासा शाखेचे दुसरे सल्लागार प्रा.डॉ. दिगंबर सोनवणे यांनी पुस्तक वाचण्याचे महत्त्व व मोबाईलच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम स्पष्ट करून यावर पुस्तक वाचन हा एकमेव उपाय असल्याचे सांगून विविध पुस्तके वाचण्यास घेण्याचे अवाहन केले.

आमच्या उपक्रमाचे पिचडगाव हे २४ वे गाव असल्याचे शब्दगंध नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर धनवटे यांनी सांगितले व वाचनाचे फायदे स्पष्ट केले .या प्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, राजेंद्र गिऱ्हे , सिताराम गव्हाणे , लहानू गव्हाणे ,जगदीश शेजुळ, शशिकांत बनसोडे , शंकर गव्हाणे ,छबुराव माळी , साहेबराव गव्हाणे , काशिनाथ गव्हाणे, दिलीप नवघरे, साखरबाई बनसोडे ,अशोक मकासरे, गणेश टिळेकर,  संदीप गिऱ्हे, दत्तात्रय हजारे, गैतम बनसोडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

 शब्दगंधच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवित असल्याबद्दल नेवासा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!