गोगलगाव पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा दुदैवी बुडून मृत्यू

Cityline Media
0


राहाता दिपक कदम तालुक्यातील गोगलगाव मध्ये म्हसोबा वस्ती येथील डाग तलावात नुकतेच दोन सख्भाखे चुलत हात पाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला या घटनेने गोगलगाव गावात शोककळा पसरली आहे.
साहिल दत्तात्रय चौधरी वय १७ आणि किरण नारायण चौधरी  (वय१४)या दोन सख्ख्या चुलत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या या घटनेमुळे गोगलगाव व परिसरामध्ये  दुःख निर्माण झाले आहे.

दत्तात्रय चौधरी आणि नारायण चौधरी हे दोघेही भाऊ हे म्हसोबा वस्ती या ठिकाणी शेतात राहतात. या  शेताशेजारीच पाझर तलाव आहे. दिनांक १४ मे रोजी चौधरी कुटुंब हे शेतामध्ये शेणखत टाकत होते.शेणखत टाकून झाल्यानंतर  हे घरी गेले.मात्र साहिल दत्तात्रय चौधरी आणि किरण नारायण चौधरी
हे दोघेजण शेताच्या बाजूला असलेला पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धूत असताना साहिल याचा पाय घसरला आणि तो खड्ड्यात पडला त्याला धरण्यासाठी किरण गेला असता तो पण पाण्यात सटकला.पाण्याची खोली जास्त असल्यामुळे दोघेही बुडाले.त्यानंतर त्यांना तेथील एका महिलेने बुडत असल्याचे पाहिले असता आरडाओरडा केला. आरडाओरड चालू असल्याने आसपासचे नागरिक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.आणि दोघांना बाहेर काढून उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आले. परंतु तेथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्यांना अंत्यविधीसाठी गोगलगाव येथे आणण्यात आले .दोघांचेही अंत्यसंस्कार हे गोगलगाव अमरधाम या ठिकाणी केले.चौधरी कुटुंबावर हा दुःखाच्या डोंगर कोसळला असून दत्तात्रय चौधरी आणि नारायण चौधरी या दोघांनाही एक मुलगा अणि एक मुलगी आहे .या दोघांच्याही मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यू मुळे गोगालगाव मधील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!