श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी
श्रीरामपूर दिपक कदम नुकतेच पाच वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांना गोपनीय बातमी मिळाली की, श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरात एका छोट्या टेम्पो मधुन अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे.
सदर प्रकरणी खात्री करुन पुढील कार्यवाही करा असे कळविल्यावरुन श्रीरामपूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथक व पंचासह एमआयडीसी परिसरात पोहचुन एमआयडीसी परिसर व आजुबाजुच्या गावात छोट्या टेम्पोचा शोध घेतला असतांना त्यांना दिघी खंडाळा रोडवर एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्र. एम एच 20 बीटी ०९५१ असा खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येतांना दिसला.
तेव्हा सदर टेम्पोला थांबवून सदर वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव मिनीनाथ विष्णु राशीनकर, (वय ३८, रा. धनगरवाडी,ता.राहाता, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.त्यावेळी वाहनचालक मिनीनाथ राशीनकर व त्याच्या ताब्यातील छोट्या टेम्पोची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या २१ गोण्या दिसुन आल्या त्यापैकी २४ गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरीत ७ गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटीक दिसुन आले.सदर वाहनचालक मिनीनाथ राशीनकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असुन गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले.
अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता अहिल्यानगर येथील फॉरेन्सीक तज्ञांशी संपर्क साधुन ते घटनास्थळी हजर होवनु त्यांनी वरील टाटा टेम्पो मधील गोण्यांमधील स्फटीक व पावडर यांचे निरीक्षण करुन प्रथमदर्शनी सदरचे स्फटीक हे अल्प्राझोलम हा अंमलीपदार्थ व पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितल्याने सदरचा खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२) ६,९७,६७ ००० रु.कि.चे ०७ गोण्यामध्ये ६९.७६६ कि.ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम चे स्फटिक (क्रिस्टल)
२) ६,६७६,७४,०००6,रु. कि.चे १४ गोण्यामध्ये ३३८.३७ कि.ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर
३) १,००,००० रु.कि.ची टाटा एस कंपनीचा छोटा टेम्पो एम २० बी.टी.०९५१ या नंबरचा जुवा कि अं.
१३,७५,४१,०००13,75,41/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर मुद्देमालाबाबत आरोपीकडे विचारणा करता त्याने सदरचा माल विश्वानाथ कारभारी शिपनकर रा. दौड, जि. पुणे याने दिला असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने व आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायीक वापराकरीता मोठ्या प्रमाणावर मिळुन आल्याने आरोपी नामे १) मिनीनाथ विष्णु राशीनकर, वय ३८ वर्षे, रा. धनगरवाडी ता. राहता जि.अहिल्यानगर
२)विश्वनाथ कारभारी शिपणकर रा. दौड जि.पुणे याने एम.आय.डी.सी. श्रीरामपूर यांच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं ४९९/२०२५ एन.डी.पी.एस. कलम ८ (क), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात आरोपी क्रं.०१) मिनीनाथ विष्णु राशीनकर याला अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास बसवराज शिवपुजे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, नितीन देशमुख,
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस, उपनिरीक्षक / रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक / दिपक मेढे, पोना/किशोर औताडे, पोना/सोमनाथ मुंडले, पोकों/संपत बडे, पोकों/ संभाजी खरात, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/ अमोल पडोळे, पोकों/अजित पटारे, पोकों/अकबर पठाण, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकों/राहुल पौळ, पोकॉ रमेश रोकडे, पोकों/ झिने, सफौ. चालक/राजेश सुर्यवंशी, पोकांचा/बाळासाहेब गिरी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोकों / नितीन चव्हाण, पोकों/ रविंद्र बोडखे, पोकों/ अमोल नागले. पोकॉ/ नितीन शिरसाठ, चालक पोकों/दिलीप कुऱ्हाडे मपोकों/अश्वीनी पवार यांनी केली.