पाटणी विद्यालयाचा वर्धापन दिन ‌उत्साहात.

Cityline Media
0


 श्रीरामपूर दिपक कदम-पाटणी विद्यालय हे श्रीरामपूर शहराचे भूषण असून या विद्यालयाने शहराला मोठ-मोठी व्यक्तिमत्व देऊन शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे असे गौरवपूर्ण संभाषण भरत कुंकलोळ यांनी विद्यालयाच्या वर्धापनदिनी व्यक्त केले.
शां. ज. पाटणी विद्यालयाचा ७९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे , अध्यक्ष भरत कुंकलोळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे, स्कूल कमिटी सदस्य भूषण साठे यांच्या हस्ते कै. दादा वामन जोशी तसेच शांतीलालजी जवाहरमल पाटणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्धापन दिनाला प्रारंभ झाला.यावेळी विद्यालयत रांगोळ्या व बलून डेकोरेशन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!