नाशिक (दिनकर गायकवाड)- सिन्रर फाटा,नाशिकरोड येथील बाजार समितीच्या आवारातून कतलीसाठी आणलेल्या सात गोवंश जनावरांची सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकास यश आले आहे.
याबाबत माहिती अशी, की सित्रर फाटा येथील बाजार समितीतून गोवंशीय गावी कतलीसाठी घेऊन जाणार आहेत,अशी माहिती गुप्त खबऱ्या मार्फत गुंडाविरोधी पथकाला मिळाली. यावर वरिष्ठांनी विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, अंमलदार विजय सूर्यवंशी,भूषण सोनवणे, गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे,राजेश राठोड, कल्पेश जाधव यांचे पथक बाजार समितीत पाठविले. या पथकाने सापळा रचला असता बोलेरो (क्र. एमएच ०५ आर ६१११) हे वाहन बाजार समितीतील पडीक जागेत येऊन थांबले.
यावेळी गुंडाविरोधी पथकाने लगेच छापा टाकून वाहन व सहा जनावरे ताब्यात घेतले. या वाहनात चार,तर पडीक जागेत तीन अशी सात गोवंश जातीची जनावरे मिळून आली. पडीक जागेतील जनावरे ही मुस्तगीन हारून कुरेशी (रा. वहाळा गाव) याच्या सांगण्यावरुन गोपीनाथ रतन सोनवणे (वय ४८, रा. मार्केट वार्डाशेजारी हे सांभाळत होते.
ही सर्व जनावरे वडाळा गाव येथे नेण्यात येणार होती.पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून सात जनावरे आणि पिकअप असा ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींना पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कामगिरी बदल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आदींनी गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर महिमा विजय सूर्योग,भूषण सोनवणे, गणेश भागवत,अभिनंदन केले आहे.