नाशिक दिनकर गायकवाड येथील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मध्ये अत्याधुनिक मायक्रो बायोलॉजी विभागाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.या उद्घाटनानंतर प्रतिष्ठित ६ वी ऋन्टियर्स इन ऑन्को सर्जरी कॉन्फरन्स सुरू इराली.ज्यामुळे कॅन्सर उपचार व वैद्यकीय प्रगतीच्या क्षेत्रातील केंद्राची बांधिलकी अधोरेखित झाली.
उद्घाटन समारंभ केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.त्यांनी मायक्रोबायोलॉजी विभाग आणि अकॅडमिक कॉन्फरन्सचे औपचारिक उद्घाटन केले. आधुनिक आरोग्यसेवेत प्रगत निदान प्रणाली, संशोधनाधारित ऑन्कोलॉजी सेवा एकत्रित करण्याचे महत्त्व जाधव यांनी अधोरेखित केले.
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, किम्स मानवता हॉस्पिटल आणि सिक्स सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि केंद्राच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कॅन्सर उपचार सुविधांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमास एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या सीईओ प्रार्थना नगरकर,प्रमुख व सल्लागार पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या डॉ. सुचित गंधे, प्रमुख व सल्लागार, नव्याने सुरू झालेल्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख व सल्लागार डॉ. कुमुदिता सोनवणे, माजी खासदार हेमंत गोडसे, एचसीजी मानवता क्युरी सेंटरचे संचालक डॉ. विरेन नगरकर आदी उपस्थित होते.
डॉ.कुमुदिता सोनवणे यांनी नव्याने सुरू झालेल्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या उपयोगांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा विभाग संसर्ग नियंत्रण प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करेल, अचूक निदान जलद होईल आणि कॅन्सर रुग्णांना वेळेवर सूक्ष्मजैविक तपासणीद्वारे थेट लाभ मिळेल, जे उपचारात अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. सुचित गंधे यांनी पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी हे प्रिसीजन ऑन्कोलॉजीचे आधारस्तंभआहेत, जे एकत्रित निदान सेवा एका ठिकाणी देतात, याबद्दल माहिती दिली. प्रार्थना नगरकर यांनी रुग्णाभिमुख सेवेसोबत मजबूत निदान पायाभूत सुविधा एकत्र करून एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर एक समा व श्रेष्ठ कॅन्सर व्यवस्थापन करणारे असागण्य केंद्र म्हणून उभे राहत असल्याचे सांगितले.
त्यानंतर ६ व्या फ्रन्टियर्स इन ऑन्को सर्जरी कॉन्फरन्समध्ये देशविदेशातील प्रतिक्षित ऑन्कोलॉजिस्ट्स, सर्जन्नस आणि आरोग्य क्षेत्रातील तज्जा सहभागी झाले. या परिषदेत कॅन्सर सर्जरीतील नवोन्मेष अद्ययावत तंत्रज्ञान व सर्वोत्तम उपचार पद्धती यावर चर्चा झाली. या वेळी ३५० हून अधिक प्रतिनिधी आणि ८५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी झाले. ज्यामुळे ही परिषद क्षेत्रातील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक शैक्षणिक घटना ठाली.
