नाशिक महापालिकेच्या सहाही विभागात काम होणार
नाशिक दिनकर गायकवाड-) शहरात गॅस पाईल लाईनसह मोबाईल कंपन्या व सीसीटिव्ही केबल टाकण्यासाठी खोदलेले खड्डे पावसाळ्यापुर्वी बुजवले जाणार असून त्यासाठी चाळीस कोटींचा खर्च येणार आहे. सहाही विभागात ही कामे होणार आहेत.
नाशिक महानगरपालिकेने शहरात पावसाळ्यात होणारी वाहतुकीची समस्या पाहता खड्डे खोदण्यास मनाई केली आहे. केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यास येत्या १५ मे ची डेडलाईन देण्यात आली आहे.
पावसाळ्यात या खड्डयांमध्ये पाणी साचते. त्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अपघाताचे प्रमाणही वाढतात. नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागते. राजकीय आंदोलनेही होतात. हा अनुभव पाहता १५ मे नंतर बांधकाम विभाग युध्दपातळीवर खड्डे बुजवण्यावे काम सहाही विभागात हाती घेणार आहे.
नवीन नाशिक प्रभाग क्रमांक २८ मधील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकणासाठी २ कोटी ९१ लाख. नाशिक पश्चिम प्र. क्र. १२ तोडलेले रस्ते दुरुस्तीसाठी ६ कोटी ६२ लाख. नाशिकरोड विभागातील प्र. क्र. १७ मध्ये ११ कोटी. नाशिक पूर्व विभागातील प्र. क्र. ३० मध्ये ५ कोटी ९४ लाख. सातपूर विभाग प्र. क्र. ९ मध्ये २ कोटी ३२ लाख. पंचवटी विभागातील प्र. क्र. २ मध्ये ६ कोटी ५२ लाख. पंचवटी प्र. क्र. ३ मध्ये ६ कोटी ३४ लाख. खर्च अपेक्षित आहे.
