पुणे प्रतिनिधी पुणे येथील वडगाव खुर्द मध्ये क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान संचलित स्व. सुषमा स्वराज महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र, वडगाव खु.येथे जनता दरबार यशस्वीपणे उत्साहात पार पडला.
या दरम्यान विविध विभागातील नागरिकांनी आपल्या भागातील समस्या,अडचणी तसेच शासकीय योजना बाबतच्या सूचना मोकळेपणाने मांडल्या. सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीसाठी निर्देश यावेळी देण्यात आले. प्रत्येक मुद्द्यावर पाठपुरावा केला जाईल, याची नागरिकांना प्रसंगी हमी देण्यात आली.
या कार्यक्रमास सिंहगड रोडचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी मार्गदर्शन केले उपस्थित राहून यावेळी वरिष्ठ नांदेड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल बोस, हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हवेली सचिन वांगडे, राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक आयुक्त, मनपा सिंहगड रोड तिमया जगले, सहाय्यक गटविकास अधिकारी हवेली पंचायत समिती नागवे, पोलिस उपनिरीक्षक श्रीमती शीतल थेंबे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष.बाबा धुमाळ, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष.राजेंद्र पवार, खडकवासला महिला अध्यक्ष शुभांगी खिरीड, युवक अध्यक्ष.सागर कोल्हे, ग्रामीण युवक अध्यक्ष .शशिकांत किवळे, श्रीमती आम्रपाली शिरसाट, समुपदेशक व इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व नागरिकांनी या जनता दरबारास सकारात्मक प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांचे संयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले लोकांच्या सहकार्यामुळेच ही लोकशाहीतील लोकाभिमुख प्रक्रिया यशस्वी होऊ शकते.समस्यांवर तोडगा संवादातूनच निघतो असा सूर यावेळी निघाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणकर यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.
