आश्वी परिसरात १५ ते १६ तासांहून अधिक वेळ विज बंद

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड- गेल्या १५ ते १६ तासाहून अधिक आश्वी बुद्रुक,आश्वी खुर्द,उंबरी बाळापुर,दाढ खुर्द ,शिबलापुर,हंगेवाडी, सह जवळपास १५ हून अधिक गावाचा विज पुरवठा आश्वी खुर्द सबस्टेशन मधील रिले नादुरूस्त झाल्यामुळे खंडीत होता.यामुळे परीसरातील सरकारी तसेच खाजगी व सरकारी बँक, सरकारी कार्यालय तसेच वीज पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या लहान मोठे व्यावसाईकांना  वीज पुरवठा बंद असल्यामुळे मोठा फटका बसला.
 दि २१ रोजी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे  दि २२ मे रोजी पहाटे २ वाजता विद्युत पुरवठा बंद झाला तो थेट सांयकाळी ६ वा परत सुरू झाली या कालावधीत विज वितरण कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करत विद्युत पुरवठा सुरळीत केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला
१५ ते १६ तासाहून अधिक काळ विज पुरवठा खंडित होता यामुळे आईस्क्रिम पार्लर तसेच परीसरातील शुध्द पाणी विक्रेतांना मोठा आर्थिक तोटा बसला आहे.  १५ ते १६ तास जर विद्यात पुरवठा बंद राहिले तर  आईस्क्रिम हे वितळल्याने मोठे  आर्थिक नुकसान होते.

आश्वी खुर्द (ता.संगमनेर) येथील वीज वितरण सबस्टेशन मधील वरिष्ठ तंत्रज्ञ हेमंत सुर्यवंशी दि २१ रोजी मध्यरात्री दोन वाजता पाऊस सुरु झाला रात्री कामावर कंत्राटी कामगार होते त्यांना यातील तांत्रिक माहिती नव्हती पहाटे ४ वाजेपर्यंत त्यांने प्रयन्त केले मात्र  पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या सकाळी पुन्हा फिटर ट्रिप झाल्याने रिले पडला टेस्टटिंग टिम ने सकाळी ट्रान्सफार्मर चेक केला असता ऑईल लेव्हल होती मात्र तो सेट होत नव्हता नंतर चेक केले असता ऑईल लेव्हल झिरो झाल.त्यामुळे दि २२ मे रीजी दुपारी २ वाजता आईल आले.सदर ऑईल डायरेक्ट कंपनी मधुन आल्याने त्यांची गुणवंत्ता चाचणी साठी त्याचे नमुने हे संगमनेर येथे पाठवण्यात आला. ऑईलचा तांत्रिक बाबीचा आव्हाल आल्या नंतरच दुपारी ३.३० बा ऑईल हे ट्रान्सफॉर्मर मध्ये टाकण्यात आले. मात्र तांत्रिक बाब असल्याने २ तास झिरो लोड ठेवत सुरु केला त्यानंतर विदयुत पुरवठा सांयकाळी  ६ वा. उशीरा सुरु झाला
 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!