भूमिगत गॅस वाहिन्यांसह इतर कामांत मदत
नाशिक (दिनकर गायकवाड)
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने सल्लागार नियुक्तीचा जणू सपाठच लावला असून आता शहर हद्दीतील ओएफसी केबल, भूमिगत गॅस वाहिन्या संबंधित कामांसाठी सल्लागार नेमला जाणार आहे. त्यास महासभेने मंजुरी दिली.
सुमन सर्व्हिसेस,अहमदनगर यांनी पत्र देवून सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागार अभिकर्ता म्हणून काम करण्यास इच्छुक असल्याचे कळविले आहे.आयुक्तांसमवेत समक्ष चर्चनुसार उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, परभणी, अहमदनगर व इतर महानगरपालिकेच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिका हद्दीतील ओ. एफ. सी. केबल व गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी सल्लागार अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यासाठीची योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहे.
ऑप्टिकल फायबर केबल व नंबरल गैस टाकणाऱ्या कंपन्या परवानगी घेताना रस्त्याच्या लांबीप्रमाणे रस्ता खोदाई करत नाहीत.बन्याचदा परवानगीमध्ये नमुद केलेल्या लांबीपेक्षा जास्त लांबीचे रस्ता खोदकामे करत असतात, त्यावर मनपामार्फत
नियंत्रण ठेवणे अत्यंत अवघड व किचकट आहे. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता या कंपन्यांना आकारली जाणारी व प्रत्यक्षात रस्त्यांचे होणारे नुकसान यामुळे महानगरपालिकेवर अतिरिक्त ताण येतो.
नाशिक महानगरपालिकेस नागरिक व राजकीय पदाधिकारी यांच्याही रोषास सामोरे जावे लागते.त्यामुळे प्रत्यक्ष कामावर देखरेख करण्यासाठी सल्लागार अभिकर्ता नेमणूक करण्यात येणार आहे.
नाशिक महानगरपालिका हद्दीत भूमिगत ओव्हरहेड ओ.
एफ. सी. गॅस वाहिन्या टाकण्यासाठी विविध कंपन्यांकडून आकारावयाचे रस्ता खोदाई करण्यासाठी शासनाचे वेळोवेळीच निर्देश, सूचना व परिपत्रकानुसार नाशिक मनपाची दरसूची तयार करणे, विविध कंपन्यांकडून नवीन दरसूचीप्रमाणे रस्ते खोदाई, तरोध कंपन्यांना आकारणी केलेला दंड वसूल करणे, असस्तिवातील सेवा वाहिन्यांचे भूमिगत केबलचे जी.पी.आर. प्रणाली सर्व्हेक्षण करून त्यांचे विनापरवानगी तपशिलावर संगणकीय माहिती मनपास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
