नाशकात तात्पुरत्या शौचालयांची १९ एजन्सीकडून प्रात्यक्षिके

Cityline Media
0
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची स्वच्छतेसाठी सज्जता

नाशिक दिनकर गायकवाड-नाशिक व आंबकेश्वर येथे येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून,तपोवन येथे तात्पुरत्या शौचालयांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. या उपक्रमात सुमारे १९ विविध एजन्सीने सहभाग नोंदविला.
वा एजन्सींनी आपल्या शौचालय प्रकारांचे सादरीकरण करून, कुंभमेळ्या सारख्या भव्य धार्मिक मेळाव्यात गरजा पूर्ण करण्यास सक्षम सुविधा मांडल्या.या प्रात्यक्षिकात एफआरपी सौचालये, स्टील शौचालये उपडी व बंद युरिना तसेच कापडी शौचालयाचे सादरीकरण करण्यात आले.या पर्यायांची स्वच्छता, देखभाल बहतुकीची सोय आणि गर्दीच्या वेळी उपयुक्तता याच्या आधारे तपासणी करण्यात आली.

या प्रात्यक्षिकांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नावर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय पाल,कार्यकरी संदेश मिरे, प्रशांत पगार, उपअभियंता समीर रकटे, तरोष कुंभमेळा नियोजनाती संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

त्यांनी सर्व निरीक्षण करून त्यांच्या पातळीवर सकारात्मक चर्चा केली.या उपक्रमातून नाशिक महत्यालिकेचा कुंभमेळ्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा भाविकांच्या सेवेसाठी हा टप्पा महत्वपूर्ण उरणार असून, अंतिम निधनार पुल नियोजन निश्चित ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पायरी असून, सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या धार्मिक घटनेसाठी नाशिक शहर सज्ज असल्याचा प्रत्यय या उपक्रमातून आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!