जबरी चोरी करणारे आरोपी मुद्द्येमालासह सहा तासाच्या आत जेरबंद

Cityline Media
0
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

नाशिक दिनकर गायकवाड नाशिक येथे जबरी चोरी करणारे गुन्हेगार चोरीस गेलेल्या १०,४२,६३२ रुपये किंमतीच्या मालमत्तेसह सहा तासांच्या आत नाशिक पोलिसांनी जेरबंद केल्याने भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि.२६/०५/२०२५ रोजी इसम नामे अरमान रसीद राईन, वय २६ वर्षे, व्यवसाय चालक, रा. प्रेमनगर, उरई, जि.जालौन,. उत्तरप्रदेश हे कांदीवली, मुंबई येथील महिंद्रा कंपनीचे प्लॉट येथुन महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच ४७ सी००००३ टीसी/१२१६ ही घेवुन मोसाराम एंटरप्रायजेस लि.लकिमपुर, केरी, उत्तरप्रदेश येथे घेवुन जात असताना सायंकाळी ०६:३० च्या सुमारास ट्रॅक्टर हाऊस,व्दारका, नाशिक येथे थांबले असता दोन अनोळखी इसम त्यांचेजवळ जावुन त्यांनी २००/- रूपये भाडे देतो मालेगाव येथे सोडुन दे 

असे सांगितल्याने चालक अरमान रसीद राईन याने त्यांना होकार देवुन व त्यांना सदर महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीत बसवुन घेतले.त्यानंतर सदर महिंद्रा बोलेरो पिकअप ही जुना आडगाव नाका येथे जाताच गाडीत बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी चालकाचे पोटाला चाकु लावुन त्यांचे सांगणे प्रमाणे गाडी चालव नाहीतर तुला ठार मारू अशी धमकी देवुन व त्यास त्याचे ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअपसह दिंडोरी रस्त्याने वणी गावाच्या पुढे घेवुन गेले.

त्यानंतर चालक अरमान रसीद राईन यास रात्रीचे अंधारात व भरपावसात गाडीतुन खाली उतरून देवुन चालकाचे ताब्यातील १०,१६,६३२/- रूपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच ४७सी०००३टी./१२१६ सी- व २५,०००/-रूपये किंमतीचा विवो कंपनीचा बी ५० मॉडेलचा मोबाईल, १०००/- रूपये रोख रक्कम असा एकूण १०,४२,६३२/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला. 

त्यानंतर इसम नामे अरमान रसीद राईन हे वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण या ठिकाणी गेले असता सदर गुन्हयांचे घटनास्थळ हे भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येत असल्याने वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण येथे फिर्यादी यांचा फिर्यादी जबाब नोंद करून व सदर जबरी चोरी बाबत गुन्हा रजि.नं. ००/२०२५ भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम ३०९ (४), १४०(३) प्रमाणे दि.२७/०५/२०२५ रोजी ०४:२५ वा. दाखल करून तो भद्रकाली पोलीस ठाणे येथे पाठविण्यात आल्याने त्यावरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १९१/२०२५ भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम ३०९ (४), १४० (३) अन्वये दि.२७/०५/२०२५ रोजी वा. गुन्हा दाखल आहे.

सदर गंभीर गुन्हयांतील आरोपीचा तात्काळ शोध घेवुन अटक करणेबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, यांनी आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१,. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, .श्रीनिवास देखमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक (प्रशा.), भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे

 मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांचे अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर गुन्हयांचा मानवी कौशल्याने व तांत्रिक पध्दतीने तपास करून सदरचा गुन्हा घडल्यापासुन अवघ्या ६ तासांचे आत आरोपी नामे १) जगदिश अर्जुन मोरे, वय ३८ वर्षे, रा. गाव दुधखेड, ता. चांदवड, जि. नाशिक २) राहुल भाउसाहेब मोगल, वय ३५ वर्षे, उगावरोड, बसस्टँड जवळ, निफाड, ता. निफाड, जि. नाशिक यांना मनमाड-नांदगाव रोड, नागापुर, ता. नांदगाव, जि. नाशिक येथील हायवेने पळून जात असताना ताब्यात घेवुन त्यांचेकडून सदर गुन्हयात चोरीस गेलेली १०,१६,६३२/- रूपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच ४७ सी०००-३टी.सी/१२१६ २५,०००/- रूपये किंमतीचा विवो कंपनीचा बी ५० मॉडेलचा मोबाईल व १०००/- रूपये रोख असा एकूण १०,४२,६३२/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीपीना सदर गुन्हयांत अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे व गुन्हे शोध पथक करीत आहेत. तसेच आरोपी जगदिश अर्जुन मोरे, वय ३८ वर्षे, याचा गुन्हे अभिलेख तपासता त्याचे विरूध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.पोलीस दिंडोरी  गुरनं.कलम १६९/२०२२भादंवि क. ४५७,३८०,३४वणी पोलिस ठाणे ३९५/२०२३ भादंवि क. ३७९ सटाणा पोलिस ठाणे २२६/२०१६ भादंवि क. ३९९,४०२ सह भाहका क. ४/२५ वडनेरभैरव पोलिस ठाणे ६१/२०१५ भादंवि क. ३९२,३६३,३४१
वडनेरभैरव ८७/२०२० भादंवि क. ३२३,३५४,५०४
वडनेरभैरव २२६/२०१४ भादंवि क. ३९९,४०२ सह भाहका क. ४/२५ वणी १३९/२०२५
भा.न्या.सं.क. ३१६ (सदर गुन्हयात पाहिजे आरोपी)

सदरची कामगिरी ही  संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर,. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१,. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर,. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) . विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक (प्रशासन), भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस उपनिरीक्षक / प्रसाद रणदिवे, पोहवा / ३७४ नरेंद्र जाधव, पोहवा / १८१६ संदिप शेळके, पोहवा/२५०२ लक्ष्मण ठेपणे, पोशि/१४६ नारायण गवळी, पोशि/२७२७ धनंजय हासे, पोशि/२७४७ जावेद शेख, पोलिस निरीक्षक /२७८६ तौसिफ सैय्यद यांनी नी पार पाडली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!