माझे लग्न जर मोडलेस तर तुझेही मोडेन असे म्हणणाऱ्या युवकांकडून तरुणीचा शारीरिक छळ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड- लग्राचे आमिष दाखवून तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून तिला लग्नास नकार देणाऱ्या पुण्याच्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही अल्पवयीन आहे. दि. २६ फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपी आकाश ताजणे (रा. कर्वेनगर, पुणे, मूळ गाव अकोले, जि.अहिल्यानगर) याने फिर्यादीस कॉलेज रोड, मॅकडोनाल्ड, नाशिक येथे भेटून लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी मैत्री केली.त्यानंतर त्र्यंबकेश्वर रोडवरील एका हटिलवर,पुण्यातील डेक्कन येथे एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन फिर्यादीची इच्छा नसताना तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, तसेच दि. २२ एप्रिल २०२५ रोजी आरोपी आकाशचा साखरपुडा झाल्याचे समजल्यावर पीडित तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही.त्यानंतर त्याने फिर्यादीस "माझे जर लग्न मोडले, तर तुझेही लग्न मोडीन," अशी धमकी फोनवरून पीडितेला दिली.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकाश ताजणेविरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!