सामाजिक न्याय विभागात मिळाला न्याय
नाशिक दिनकर गायकवाड येथील पल्लवी पगारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे (बार्टी) संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात रुजू करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील पल्लवी पगारे या बार्टीच्या माध्यमातून मुक्तिभूमी येथे संशोधन अधिकारी तथा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या.परंतु त्यांना अचानक कार्यमुक्त केल्यामुळे त्यांना धक्का बसला होता.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतल्यानंतर तत्काळ मंत्रिमहोदयांनी संबंधित विभागाशी बोलून तत्काळ कामावर रुजू करून घेण्यास सांगितले.
याबाबत येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा केला होता.त्याचबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी तालुक्यामध्ये मोठे आंदोलन छेडले होते.
या आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला.पगारे रुजू झाल्यानंतर मंत्री शिरसाठ यांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, स्वारिपाचे विनोद त्रिभुवन, सिद्धार्थ हिरे आदींनी त्यांची भेट घेतली व आभार मानले.
