नाशिक दिनकर गायकवाड सीबीआयमधून बोलत असल्याचे भासवून अनधिकृत पैशांचा व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती देऊन एका इसमाकडून ४८ लाखांची खंडणी उकळत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सायबर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना व्हॉट्स ॲपद्वारे मोबाईलवर संपर्क साधला. मुंबई सीबीआय कार्यालयातून पोलिस अधिकारी मोहनदास असल्याचे सांजून त्यांनी फिर्यादीच्या आधारकार्डचा वापर करून विविध राज्यांत बैंक खाते ओपन करण्यात आले असून, या खात्यांमधून एकूण साडेआठ कोटी रुपये अनधिकृत पैशांचा व्यवहार केल्याबा गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली.
सीबीआयचा लोगो असलेले एक पत्र पाठवून त्यामध्ये फिर्यादीचे करून त्यांच्याविरुद्ध मनीलॉन्ड्रींग, इग्ज वाहतूक व हवाला या अपराधांचे गुन्हे दाखल अनाल्याची धमकी दिली. त्याप्रमाणे सायबर गुन्हेगारांनी बनावट चौकशीच्या नावाखाली त्यांच्या दोन्ही बँक खात्यातील सर्व रक्कम त्यांच्या विशिष्ट बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरले नाही तर फिर्यादीसह त्याच्या सर्व कुटुंबियांना धोका असल्याची खोटी माहिती दिली.आरोपींनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्यांच्या विशिष्ट बैंक खात्यांमध्ये
४७ लाख ८७ हजार ५०० रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडले. सदर रकमेबी फिर्यादीकडून खंडणी उकळती म्हणून संबंधित अज्ञात मोबाईलधारक,बैंक खातेधारक, साधणारा इसम यांच्याविरुद्ध खंडणी व फसवमुकीचा गुन्हा सायबर पोलीस ठाण ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दरिष्ठ पोलीस निरीक्षक कवळे करीत आहेत. हा प्रकार दि. १४ ते २० मे दरम्यानच्या काळात ऑनलाईन पद्धतीने पडला.
