तहसीलदार पदासाठी १२ लाख हवे आहे असे सांगून नाशकातील तरुणांना घातला गंडा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड तहसीलदारपदाची सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन जणांनी एका तरुणाला बारा लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अक्षय अनिल झंवर (रा. निर्मम उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) यांच्याशी आरोपी अतुल पेठकर, वजीर हुजावर व सोनाली मॅडम नामक महिला अशा तिघा जणांनी संपर्क साधला. फिर्यादी झंवर यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने झंवर यांना तहसीलदारपदाची सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर झंवर यांच्याकडून या तीनही आरोपींनी जानेवारी २०२४ ते २६ जून २०२५ या कालावधीत हॉटेल एसएसके समोर गोल्फ क्लब मैदान येथे रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण १२ लाख रुपये घेतले; मात्र नोकरी लावून दिली नाही, तसेच घेतलेले पैसे परत न करता झंवर यांची फसवणूक करून त्यांनी दिलेल्या रकमेचा अपहार केला.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अतुल पेठकर, वजीर हुजावर व सोनाली मॅडम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!