नाशिक दिनकर गायकवाड फेसबुकवरील छायाचित्राचे स्क्रीनशॉट घेऊन व मॉर्फ करून ते व्हायरल करून ऑनलाईन करून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पोलिसांनी दीपक सूर्यवंशी (रा. मोटकरी एनक्लेव्ह, गोविंदनगर, मूळ रा. कल्याण, जि. ठाणे) याने दि. ७ ते ९ जून दरम्यान फिर्यादी महिलेच्या फेसबुक अकाऊंटवर असलेल्या छायाचित्रांचे स्क्रीनशॉट घेऊन ते मॉर्फ केले.
त्यानंतर मॉर्फ केलेले छायाचित्र त्याच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून प्रसारित अश्लील कमेंट करून त्यांचा लैंगिक छळ केला व स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी - सायबर पोलीस ठाण्यात दीपक सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.