नाशिक दिनकर गायकवाड-- राज्यभरात बंदी असतानाही सुगंधित तंबाखू नाशिकच्या नांदगाव शहरात खुलेजाम विक्री केली जात आहे.मात्र याकडे प्रशासनाची डोळझाक होत आहे याबाबत शासन उदासीन आहे नुकतीच नांदगाव पोलिसांनी सुगंधित तंबाखू आणि केसरयुक्त पान मसाल्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवर धड़क कारवाई केली.
खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदगाव साकोरा रोडवर बोलेरो पिकअप थांबवून तपासणी केली असता त्यात तब्बल १६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार राजू भोरे, दवाश्य सोनवणे, स्वी पवार, सागर बोगतो, सिद्धार्थ वाय, यांनी केली असून माहेर निबोध मार बिंदूर तालुका निफाड अशा दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अवैध सुगंधित तंबाखू व केसर पानमसाला खुलेआम विक्री करणाऱ्यांवर वचक बसला आहे
