श्रीरामपूर दिपक कदम: महाराष्ट्र शासन व प्रशासनाने १५ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राज्यातील १३ जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मोठा गाजावाजा करून १ मे २०२५ रोजी सुरू करण्यात आले.परंतु कुठल्याही स्वरूपाचे अधिकार प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या १३ जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तातडीने मंत्रालय व आयुक्त कार्यालाकडे पाठपुरावा करून डी.डि.ओ कोड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अशी माहिती दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी दिली.
दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, जीपीएफ,मेडिकल बीले,सेवानिवृत्त कर्मचारी व त्या अनुषंगाने सर्व कामे प्रलंबित होते ती सर्व मार्गी लागेल.त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या योजना देखील कार्यान्वित होतील.
संघटनेने व नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री नामदारअतुल सावे यांनी तातडीने दखल घेतली. त्यानुसार ४ जून २०२५ रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव भा.रा.गायकवाड यांनी तातडीने आदेश निर्गमित केले. दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव मा.भा. रा.गायकवाड यांनी ४ जून २०२५ रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.दि. ६ जून २०२५ रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त यांनी १३ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहे.
सदर आदेशामुळे १३ जिल्ह्यातील कर्मचारी व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
यावेळी दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहिल्यानगर यांचे सर्वांनी विशेष आभार मानले. आहे.याकरिता संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे,उपाध्यक्ष चांगदेव खेमनर,खजिनदार प्रदीप भोसले,श्रीरामपूर मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी,नागनाथ शेटकर,रमेश टिक्कल,ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.
