नाशिक दिनकर गायकवाड पावडी परिवारातील नव्याने बांधलेल्या २२३ सदनिकांना मनपाचे अखेर घरपट्टी लागु केली आहे..
पाथर्डी परिसरात नाशिक महानगर पालिकेने मोहीम राबवून तब्बल नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २२३ सदनिका धारकांना घरपट्टी लागू केली आहे. नाशिक महानगर पालिकेनेचा यापूर्वी जकात हा उत्पनाचा मोठा स्त्रोत होता. ती बंद झाल्यानंतर घरपट्टी हा मोठा स्त्रोत आहे. जुनी थकबाकी रखडली म्हणून महापालिका मिशन राबवत असताना दुसरीकडे मात्र,अनेक मिळकतींना घरपट्टीच लागू नसते.
महापालिकेच्या पावडी येथील घरपट्टी विभागाने म्हाडा अंतर्गत न्यू पंचगंगा को. ऑप. सोसायटी आणि इतर एकूण ५ इमारती मिळून २२३ सदनिका धारकांना एकत्रित घरपट्टी आकारणी करण्यात आली.
हे प्रकरण २०१७ पासून प्रलंबित असल्याने
सदनिका धारक अडचणी येत होते.
मात्र नाशिक महानगरपालिका आयुक्त दता प्रशासक मनीषा खत्री, उपायुक्त अजय निकम, विभागीय अधिकारी जयगी बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी घरपट्टी विभागाचे कर निरीक्षक राजेंद्र मोरे, वरिष्ठ भाग लिपिक दीपक कोथमिरे, भाग लिपिक प्रशांत राऊत, साजिद शेख यांनी घरपट्टी लागू करून नऊ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मिटवला.
दरम्यान घरपट्टी लागू केल्याबद्दल कर निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यासह सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सरकार करण्यात आला. यावेळी अनेक सभासदांनी प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल कर्मचा-यांचा आभार मानले. यावेळी सहकार क्षेत्रातील महाजन, सोसायटीचे संतोष रिपोते, विकारा कातमानी, विजय जगताप, कातकाडे भिकाजी, हरिश्चंद्र जोगदंड, विजय सानप, दत्ता आव्हाड आदी सभासद उपस्थित होते.
