नाशिक दिनकर गायकवाड रिक्षाच्या प्रवासात शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी महिला प्रवाशा जवळील सुमारे आठ तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.
फिर्यादी नीता रमेश रिक्कल (रा. बनात बाळ, देवळाली कॅम्प) या दि. १२ एप्रिल रोजी देवळाली कॅम्प ले लेम रोड दरम्यान रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यावेळी शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी रिक्कल यांच्या जवळ असलेले १ लाख ४० हजारांचे मंगळसूत्र, २८ हजारांचा नेकलेस व १५ हजार रुपये किमतीचे झुमके असे १ लाख ८३ हजारांचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
