नाशिक दिनकर गायकवाड- दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई-मेलद्वारे वीज बिल स्विकारण्याच्या गो ग्रीन सुविधा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट महावितरण कडून दिली जात असून, वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा,असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.
महावितरणकडून 'कागद वाचवा, पर्यावरण वाचवा' या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलद्वारे वीज बिल पाठविभ्यात येते. शिवाय पहिल्याच वीज बिलात पुढील बारा महिन्यांसाठी तत्काळ १२० रुपये एकरकमी सवलत देण्यात येते.
महावितरणच्या राज्यातील ३ कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत ६ लाख १६ हजार ब्राहकांनी तो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे.यामध्ये नाशिक मंडलातील २५ हजार ३५३, मालेगाव मंडलातील ४ हजार ९४ आणि अहिल्यानगर मंडलातील १९ हार६वीक म्हणजे नाशिक परिमंडलातील एकूण ४८ हजार ४१३ ग्राहकांनी गोन सेवेचा लाभ घेतला आहे.भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात तत्काळपणे १२० रुपये एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला
ग्राहकांनी मोबाईलच्या माध्यमातून हा क्यू आर कोड रन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो-ग्रीन नोंदणी कती करावी, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या पोस्टर्सच्या महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात तथा शहरातील कार्यालयात लावण्यात आलेले असून, विद्युत ग्राहकांनी सदर पोस्टर्सवरील क्यू आर कोड मोबाईल द्वारे स्कॅन करून चित्रफितीद्वारे दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने गो-ग्रीन नोंदणी करावी.
वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसबा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामाने १० रुपयांची सूट देण्यात येत असून, इतरही ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन पर्यावरणरक्षणाचा सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
