पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी-लेनिनवादी ) लिबरेशन राज्य संयोजन समितीची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली.यावेळी भाकप-माले चे महासचिव कॉ. दीपंकर भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत यावेळी श्रीरामपूर येथे पार पडलेल्या विलनिकरण ऐक्य परिषदेबाबतचा आढावा घेण्यात आला. तसेच भाकप-माले पक्षाचे राज्य अधिवेशन घेण्याबाबत करावयाची संघटनात्मक तयारीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रात पक्षाचे कामकाज मोठ्या मजबुतीने वाढविण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.यावेळी कॉ. उदय भट,कॉ. प्रभात कुमार,कॉ. अतुल दिघे,कॉ. अजित पाटील, कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. उद्धव शिंदे,कॉ.शाम गोहील,कॉ. राजेंद्र बावके, कॉ. मुक्ता मनोहर,कॉ. मेधा थत्ते,कॉ. विजय कुलकर्णी, कॉ.पी. के. मुढे, कॉ. पांचाळ, कॉ. विप्लव मेश्राम, कॉ. विकास आळवनी आदीसह राज्यभरातून कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
