मुंबई विशाल सावंत-एस.टी.महामंडळ ही महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली जीवनवाहिनी आहे.तर ग्रामीण भागात देखील लालपरीचा प्रवास महत्त्वपूर्ण ठरत आहे.
आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. या माध्यमातून एस.टी.महामंडळाची सद्य आर्थिक स्थिती,भविष्यातील धोरणात्मक निर्णय,उत्पन्न वाढीचे पर्याय आणि खर्चात काटकसर यावरील उपाय योजनांची सविस्तर माहिती राज्यातील जनतेसमोर मांडली.
ही श्वेतपत्रिका म्हणजे केवळ आकडेवारी नव्हे,तर पारदर्शक कारभार,जबाबदारीची जाणीव आणि भविष्यातील विकासाची दिशा दर्शवणारा आराखडा आहे. कर्मचारी वर्ग, प्रवासी नागरिक आणि शासन यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे बोलले जातेय
