नाशिक दिनकर गायकवाड-आक्षेपार्ह पॉम्प्लेट तयार करून ते सार्वजनिक ठिकाणी लावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य करून विनयभंग करीत महिलांची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही एकलहरा रोड परिसरात राहते.या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की कोणी तरी अज्ञात इसमाने "खुशखबर! खुशखबर !! आमच्याकडे सर्व प्रकारच्या सर्व्हिस मिळेल, एक तास एक हजार रुपये, तीन तास दोन हजार रुपये, सहा तास सहा हजार रुपये, तसेच फुलटाईम विथ बेड सर्व्हिस १२ हजार रुपये, तसेच यासाठी आम्ही उत्तम सर्व्हिस देतो,
साऊथ, नेपाळी, बंगाली, काश्मिरी, फॉरेनर महिला उपलब्ध असून, नाशिक, मुंबई व पुण्यात फोनवर संपर्क करा," असा मजकूर असलेले पॉम्प्लेट तयार करून ते सार्वजनिक ठिकाणी लावले.त्यामुळे फिर्यादी महिलेला विविध मोबाईल क्रमांकांवरून "तुम्ही सर्व्हिस देता का," असे म्हणून फोन कॉल्स व व्हॉट्सअॅप मेसेज येऊ लागले. त्यामुळे फिर्यादीच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होऊन त्यांची बदनामी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात इसमाच्या विरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात बदनामीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देवरे करीत आहेत.
