दादांसोबत जाण्यास ताईही तयार ?
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन,मात्र यंदा हा दिवस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा केला.अशातच सुप्रिया सुळेनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होणार असल्याच्या चर्चा केल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहे. त्यात मागील दोन महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमिताने आठ ते १० वेळा एकत्र आल्यामुळे या चर्चला बळ मिळाले. त्यातच आज पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमिताने सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट आणि एकच वक्तव्यामुळे दादा आणि ताई एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर घरला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दादांची आठवण प्रत्येकवेळी येते,असे वक्तव्य केले, त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.दरम्यान, शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी, आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जायची इच्छा आहे,असे विधान केले होते.
शरद पवार गटाचा सोहळा पुण्यातील बालगंधर्व मंदिरात धाजारोहणाने सुरू झाला. तर, दुसरीवडे अजित पवार गटानेही आपला स्वतंत्र कार्यक्रम ठेवला आहे.आज वर्धापन दिनाच्या आधी सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे चचाँ रंगली आहे. 'सहन करायला शिका', असे सुळेंनी स्टेट्स ठेवले होते. यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'माझ्या आईने दिलेला सल्ला मी माझ्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता, ते माझे वैयक्तिक मत आहे',असे त्या म्हणाल्या.
