श्रीरामपूर दिपक कदम-स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांसाठी चालविलेले अभियान आहे स्वच्छतेला महत्व दिले तरच भारत प्रगतीपथावर येईल आणि भारतातील प्रत्येक नागरिक सर्वथैव सुखी जीवन जगतील मात्र श्रीरामपूर येथील नगरपालिकेच्या अनागोंदीमुळे या अभियानाचा अक्षरश:फज्जा उडाला असून पंतप्रधानांनी सुरू केलेले अभियान केवळ येथील नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच सपशेल अपयशी ठरले आहे.
नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार असल्याने प्रशासनाचे सर्वत्र दुर्लक्ष होताना दिसतेय त्यामुळे प्रत्येक वार्ड मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे उघडी गटारेमुळे अनेक साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. नगरसेवक नसल्याने सर्वत्र मनमानी कारभार सुरू आहे. सिटीलाईन न्यूजच्या प्रतिनिधीने येथील बऱ्याच वाड मधील नागरिकांचा समस्या जाणून घेतल्या त्यात कचरा आणि घाणीचे दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आज पासून धास्तावलेले आहेत यातुन नगरपालिकेत विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसतोय.
